अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत
श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत यांच्यावतीने जत येथील कोविड सेंटरमध्ये असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना आज मोफत अन्नदान करून या उपक्रमाचा २० दिवसानंतर समारोप करण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील कोविड रूग्णांना रूग्णालयात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या रूग्णांच्या काळजीपोटी कोविड सेंटर बाहेर झाडाच्या आडोशाला बसलेले दिसून येतात.सध्या लाॅकडाऊन असल्याने या नातेवाईकांच्या जेवणाची गैरसोय सुरू असल्याने जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जतमधील सामाजिक संस्था व संघटनांना कोविड सेंटरमध्ये असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान सेवा सुरू करण्याचे आवाहन केले होते.
त्या आवाहनानुसार येथील श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जतचे अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार,उपाध्यक्ष अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील,दिपक पाटणकर, सदाशिव जाधव गणेश पवार,संतोष तोरणे, राहुल व्हसमाळे आदींनी जत येथील कोविड सेंटरमध्ये असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना गेली एकोणीस दिवस मोफत अन्नदान वाटप व पिण्यासाठी मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा पुरवठा केला आहे.
आज अन्नदान वाटपाचा समारोप असल्याने आज भाताची खिचडी व जिलेबीचे वाटप रूग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले आहे. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जतने कोरोना योद्धे म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडणारे, चौकाचौकात उभे राहून बंदोबस्त करणारे पोलीस बंधू ,भगिनींनाही अन्नदान व पिण्याचे पाणी पुरविले आहे. श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जतने सुरू केलेल्या या उपक्रमाला समाजातून चांगले सहकार्य व पाठींबा मिळाला आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद