प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/हिंगणवाडी:
हिंगणवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. देशभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम करण्यात शासनाने काही नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी मोठ्या उत्साहाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची साजरी होते. परंतु सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचे सावट होते. तरीही ग्रामपंचायत कार्यालय हिंगणवाडी येथे शासनाच्या आदेशाचे पालन करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संपूर्ण जीवनात अनेक समाज उपयोगी कार्य केले. शेकडो मंदिराचा जिरणोध्दार असेल किंवा तलाव, घाट, विहीर, पाणपोई, किंवा मग किल्याच्या डागडूज असेल इतकेच नव्हे तर मुस्लिम बांधवांच्या मशिदी असेल अहिल्यादेवी या विज्ञानवादी होत्या. म्हणूनच अहिल्यादेवी कार्याची किर्ती ही साता-समुद्रापार गेलेली आपणांस पाहवयास मिळते. जयंतीप्रसंगी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती हिंगणवाडीचे संतोष आयनोर, खुशाल सोर, नाना शिंदे, रवी सोर, पुंडलिक शिंदे, राहुल शेरमाळे,विकास मदणे, संतोष सोर, भारत शिंदे, मच्छिंद्र शिंदे, संतोष पवार, भगवान खंबायत, रोहिदास शेरमाळे, नरेंद्र शिंदे, अरूण आयनोर आदींची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद