सनमडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

अहिल्यादेवी होळकर यांचे पूज्यनीय स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनात – तुकाराम धायगुडे 

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

 “अहिल्यादेवींवर कौटुंबिक आघात अनेक झाले. ऐन तरुण वयात त्या विधवा झाल्या. काही काळाने कर्तबगार सासरे मल्हाररावांचे आणि एकुलत्या एक  पुत्राचे निधन झाले. पण आपल्या प्रजेसाठी असलेल्या निष्ठेने सारी कौटुंबिक दु:खे बाजूला सारत त्यांनी आपला राज्यकारभार उत्तमरीतीने पार पाडला.  परमेश्वरावरील प्रगाढ भक्तीमुळे अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला. या निश्चयी स्वभावामुळे अहिल्यादेवीने आपले पूज्यनीय स्थान प्रत्येक भारतीयाच्या मनात  केले आहे”. असे मत निल-गंगा फायनांन्शिअलचे संस्थापक-अध्यक्ष तुकाराम धायगुडे यांनी व्यक्त केले. सनमडी येथे राजमाता अहिल्यादेवी मित्रमंडळ यांच्या वतीने घेण्यात आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य अमोगसिध्द बिरादार यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुजनानंतर युवकांनी ‘यळकोट,यळकोट, जय मल्हार!’ अशा घोषणा दिल्या. कोरोनाच्या सर्व शासकीय नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी व्यंकटेश नरुटे,अजय धायगुडे ,हणमंत पाटील,अमोल लवटे, मारुती नरुटे ,मनोज म्हारनुर,अजय कर्ले, भीमराव पाटील, शिवाजी सलगर ,रितेष सरगर ,शिवाजी सलगर ,श्रीमंत धायगुडे,आदि अहिल्याप्रेमी युवक उपस्थित होते.