
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
गोरडवाडी येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सॅनिटायझर व पंप , कुटुंबात प्रत्येकाला मास्क ,प्रत्येक कुटुंबाला डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले . संपुर्ण जगातील यशस्वी आणि कर्तबगार महिलांचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिने महान कार्य केले आहे.अशा महान कार्य करणाऱ्या महिलांमधून एक नाव अग्रक्रमाने येते ते म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर. त्यांनी 28 वर्ष यशस्वीरीत्या राज्यकारभार चालवला, त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती, पशु-पक्षी आनंदी होते. अशा मातेच्या जयंती निमित्त गोरडवाडी गावात या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
जगासमोर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे . या संकटात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, तरी आपण वरिल साहित्याचा नियमित वापर केला तर आपण कोरोना विरूद्धची लढाई यशस्वीरित्या जिंकू शकतो.त्यासाठी प्रत्येकाने स्वत:शी प्रामाणिक राहिले पाहिजे. मी घराबाहेर पडताना नियमित मास्क वापरणार,कुटुंबातील व्यक्ती सोडून कोणीही व्यक्ती संपर्कात आला तर मी सॅनीटायझरने हात स्वच्छ करणार असा संदेश देण्यात आला.ग्रामपंचायत गोरडवाडी यांनी आयोजन केले.अनिल फरांदे ,बळीराम चव्हाण ,लाला बाजारे,गोरख देशमुख ,प्रमोद पोरे,रामचंद्र तात्या शिवरकर यांनी गोरडवाडी गावासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक रविंद्र पवार ,सरपंच बायडाबाई गोरड ,उपसरपंच मैनाबाई गोरड ,बाळासाहेब गोरड ,दिपक गोरड , विजय गोरड , माणिक कोकरे , पांडुरंग पिसे , विष्णू गोरड , दादा गोरड , लक्ष्मण गोरड , रामचंद्र गोरड , भागवत कर्णवर , प्रवक्ते शरद कर्णवर , इंजिनीयर बळवंत गोरड , प्रा .अजितकुमार हुलगे , प्रा. दादासाहेब यमगर , याकोप शिकलगार , आजिनाथ कर्णवर , हनुमंत गोरड , संतोष गोरड , संजय कोळेकर यासह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद