माळशिरसमध्ये सचिन वावरे मिञ परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी! 351 कुटुंबांना किटचे वाटप

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस  :

माळशिरस येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात आणि जिल्हात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.त्याचा परिणाम गोरगरीब व ज्या लोकांना कामावर गेल्याशिवाय अन्न मिळत नाही,अशा लोकांचं जगणं अवघड झालं आहे.दिवसभर काम करावे,तेव्हा रात्रीची चुल पेटते, सध्य परिस्थितीत लोकांच्या हाताला काम मिळत नसल्याने अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली.अशा लोकांची लॉकडाऊन काळात उपासमार होवू नये, म्हणुन सचिन वावरे मिञ परिवार त्यांच्या मदतीस धावून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे 351 कुटूबांना व त्याचबरोबर सॅनीटायझर व मास्कचे वाटप तहसिलदार जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसूलचे नायब तहसीलदार डी.एन.काळे, माजी सरपंच तुकाराम देशमुख, महादेव देशमुख, सचिन वावरे, सुरेश वाघमोडे, पोपटराव वाघमोडे, मिलिंद पाटील, पांडुरंग देशमुख, नारायण पाटील, सचिन गोरे, सुनिल गोरे, विष्णुपंत टेळे, हरिभाऊ देशमुख, योगेश देशमुख, काकासाहेब देशमुख, शिवाजी देशमुख, अर्जुन देशमुख, मारूती गोरे, पोपट घोडके, राजेंद्र टेळे, तात्या टेळे, बापूराव टेळे, मारूती येडगे, पांडुरंग येडगे, टि.डी.देशमुख, प्रकाश टेळे, रामभाऊ घोडके, शिवाजी दडस, महेश वावरे, पलिविंदर देशमुख, बबन खताळ ,बापू वाघमोडे, बापूराव शिरसकर, धुळदेव सजेॅ, हणुमंत पांढरे, संतोष वगरे, प्रशांत वगरे, बापूराव शिंगाडे, बापूराव गोरे, आबासाहेब वावरे, आण्णा सरगर, अजय येडगे, संतोष देशमुख, धुळदेव देशमुख, तुकाराम सुळ, यासह मान्यवर उपस्थीत होते. सचिन वावरे मिञ परिवाराच्या वतीने अनेक सामाजिक कार्य केले जाते.
सचिन वावरे मिञ परिवाराच्या माध्यमातून एक हात मदतीचा हा उपक्रम राबवला आहे. माळशिरस येथील लोकांशी भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. ज्या लोकांना खरोखरच गरज आहे,अशा 351 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. सचिन वावरे मिञ परिवार यांनी माणुसकी दाखवून गरीब कुटुंबांना मदत करत आहेत.