अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
वळसंग गावचे सुपुत्र, यशस्वी उद्योजक,सह्याद्री फाऊंडेशनचे चेअरमन,प्रतिभा ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे CEO व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतिशदादा चव्हाण यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे .कोरोनाच्या महामारीमध्ये सतिशदादांनी अनेकांना आधार दिला.अनेक रूग्णांना मदत केली आहे.तसेच कोरोना रूग्नांना दवाखान्यात नेत असतांना वाहने मिळत नसल्याने व काही वाहनधारकांकडून रूग्णांची पिळवणूक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी एक संकल्प केला व सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी जत तालुक्यातील रूग्णांसाठी एक रूग्णवाहिका आपल्या माध्यमातून असणे गरजेचे आहे हे लक्षात आले.म्हणून दि.३१/०५/२१ रोजी सतिशदादा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांच्या १७ व्या वाढदिवसानिमित्त ,सह्याद्री फाऊंडेशन व प्रतिभा ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज यांच्यावतीने जत तालुक्यासाठी एक आॅक्सिजन सिलिंडरयुक्त रूग्णवाहिका लोकार्पण करण्याचे नियोजन केले आहे.सदर लोकार्पण सोहळा विलासराव जगताप यांच्याहस्ते व प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसिलदार सचिन पाटील,गटविकासअधिकारी धरणगुत्तीतेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.हा रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा दि.३१/०५/२१ रोजी दुपारी बारा वाजता तहसिलदार कार्यालयासमोर पार पडणार आहे,असे सतीशदादा चव्हाण यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद