धनगर समाजाच्या प्रश्नांवर मुख्य घटकांनी राजकारण विरहित एकत्र यावे- प्रा.नारायण खरजे

राजकारण विरहीत धनगर समाजाच्या प्रश्नांवर मुख्य घटकांनी एकत्र या- प्रा.नारायण खरजे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाजबांधवांना नम्र आवाहन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
धनगर समाजाच्या प्रश्नांवर मुख्य घटकांनी राजकारण विरहीत एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र धनगर समाज एकीकरण समितीचे प्रा.नारायण खरजे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाजबांधवांना केले आहे.ते म्हणाले,३१ मे २०२१ च्या पूर्वसंध्येला प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डिजिटल जयंती साजरी करून त्या मुख्य समाज घटकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन व सध्याच्या  कार्यरत अशा दोन्ही सरकारला धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची उत्तरे मागुया. समाजहितासाठी खालील प्रश्नांची उत्तरे अत्यंत महत्त्वाची आहेत.१. तत्कालीन भाजपा सरकारने धनगर-धनगड एकच आहेत, हे लेटर हायकोर्टात दिले आहे का? दिले असेल तर ते सादर करावे. २. तत्कालीन भाजपा सरकारचा धनगर आरक्षण बाबतीतला टिस चा अहवाल सादर करावा म्हणजेचA. नक्की सर्वे कुठे आणि कोणाचा केला. B. सर्वे मध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किती ℅ बांधवांना भेटलात तर टीसचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह/समाजाच्या विरोधी कसा आला? C. समाजातील कोणत्याही संघटनांना सर्वेची साधी कल्पना नाही मग सर्वेचे अधिकारी यांनी काय केले. ३. शेळी मेंढी विकास महामंडळाला निधी/अध्यक्ष द्यावा नाहीतर मोकळे महामंडळ काय कामाचे? ४. आरक्षणाच्या मुद्द्यांवरती समाजबांधवांना झुलवायचे आणि समाजातील ज्वलंत मुद्दे व प्रश्नांना बगल द्यायची. ५. गेली सत्तर वर्षे एकतर समाजाला मिळाले नाही असे सांगून,समाजातील महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढून एक- एक प्रश्न सोडवणे महत्वाचे वाटत नाही का? ६. समाजातील उच्च पदस्थ  प्रामाणिकपणे काम करणारे उच्चशिक्षित, राजकारणाविरहीत काम करणाऱ्या Class one officer यांची कृती समिती बनविणे योग्य ठरेल काय? ७. इतर समाजातील ज्वलंत प्रश्नांवरती प्रकाश टाकणे.यासारख्या प्रश्नावर एकसंघपणे विचारविनिमय करण्याची गरज महाराष्ट्र धनगर समाज एकीकरण समितीचे प्रा.नारायण खरजे यांनी व्यक्त केली आहे.