
पारंपारिक धनगरी पोशाखात घरीच अहिल्यादेवींची जयंती साजरी करा:आमदार पडळकर यांचे महाराष्ट्रभर आवाहन !
झरे येथे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर,भाजपा नेते जयवंतराव सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
धनगर समाजातील युवक बांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पारंपारिक धनगरी वेशभूषा करून घरातच साजरी करावी,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रातील युवक व समाज बांधवांना केले आहे. यासंदर्भात झरे येथील गेस्ट हाऊस येथे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर,भाजपा नेते जयवंतराव सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आमदार पडळकर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे जयंती साजरी करण्याबाबत उभयतांनी आवाहन केले.भाजपा नेते जयवंतराव सरगर म्हणाले की,सोमवार दिनांक 31 मे रोजी पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. परंतु सलग दुसर्या वर्षीही कोरोना महामारीचे संकट असताना त्याला सामना करण्यासाठी लॉकडाऊनची परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग होण्याचे धोकेही जास्त आहेत. आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे समाज बांधवांनी कोरोनाचा धोका न पत्करता व समुदायाने एकत्र येऊन जयंती साजरी करण्यापेक्षा कोरोणाचे नियम पाळून आपल्या घरातच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करावी.त्याचबरोबर जयंती साजरी करताना पारंपारिक धनगरी पोशाख परिधान करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करावे,असे आवाहन त्यांनी केले.माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांनी 31 मे रोजी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पारंपारिक धनगरी पोशाख परिधान करून घरातच प्रतिमेला अभिवादन करावे, अशी संपूर्ण महाराष्ट्रभर हाक दिली आहे. त्यानुसार सर्व धनगर युवक बांधवांनी त्यास प्रतिसाद देऊन प्रत्येक जिल्हा, तालुका व गावागावात हा संदेश देत आवाहन केल्याप्रमाणे जयंती साजरी करावी. माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर,भाजपा नेते जयवंतराव सरगर यांच्यासह आटपाडी तालुका अध्यक्ष उमाजी सरगर, विष्णूपंत अर्जुन, गणेश भुते, आटपाडी तालुक्यातील कार्यकर्ते व समाज बांधव या बैठकीला उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद