
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा

अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जोपासावी: विक्रम ढोणे
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मनामनात,घराघरात हा गेल्या काही वर्षापासून रुजलेला नारा यंदा कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. सध्याची देशभरातील कोरोना सदृश्य परिस्थिती पाहता हे संकट सर्व जगावर ओढवले आहे. यातून नागरिकांच्या रक्षणासाठी संचारबंदी,जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करुन,अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जोपासावी,असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
सध्या देशात निर्माण झालेले कोरोनाची परिस्थिती व संचारबंदीचा विचार करता चालू वर्षाची जयंती समाजाने सामाजिक अंतराचे पालन करून घरातच साजरा करावी.कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आले असताना जयंतीच्या निमित्ताने संचारबंदी आदेशाचे पालन करण्यात यावे.जयंतीनिमित्त समाजबांधवाकडून वृक्षारोपण करुन एक आदर्श निर्माण करावा. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेसह अन्य महापुरुषांच्या प्रतिमेची पूजा करून जगभरावर आलेल्या कोरोना या महाभयंकर संकटातून बाहेर काढण्याची प्रार्थना करावी.आता सध्या कोणतेच उत्सव,सण,समारंभ न करण्याची वेळ कोरोनाने आणली आहे. जर आपल्याला कोरोनाच्या लढाईतून यशस्वी व्हायचे असेल तर पुण्श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच साजरी करुन एक आदर्श निर्माण करुन शासनाला सहकार्य करून
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. तरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचे आचरण करणाऱ्या सर्व समाजातील बांधवांनी जयंती उत्सव घरात साजरी करून देशाला कोरोनाच्या विळख्यातून मुक्ततामिळविण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहनही समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो,याची जाण ठेवून,निसर्गाचे देणं आहे, या कृतज्ञतेच्या भावनेतून समाजातील प्रत्येक बांधवांनी पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी आपआपल्या क्षेत्रात वृक्षारोपण करुन किमान एक तरी झाड लावून जयंती साजरी करावी,असे आव्हान धनगर विवेक जागृती अभियानाचे आयोजन विक्रम (भैया) ढोणे याच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद