‘श्रीराम’ची ॲम्बुलन्स कोरोनाकाळात पुरविणार मोफत सेवा!

संतोषभाऊ पुजारी व दत्तात्रय पाटील (पंच) यांच्याकडे जबाबदारी सुपूर्द

मोहनराव पुजारी

 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

कोरोना काळात गरजू रुग्णांना मोफत सेवा देण्याबरोबरच आटपाडी तालुक्यातील रुग्णवाहिकेची गरज पूर्णत्वास नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. श्रीराम बहुउद्देशीय संस्थेला मिळालेल्या या ॲम्बुलन्सची ही सेवा गरजूंना देण्याची जबाबदारी युवासेनेचे तालुकाध्यक्ष पैलवान संतोषभाऊ पुजारी व दत्तात्रय पाटील (पंच) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेच्या चाव्या त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विट्याचा राजा गणेश मंडळाला एक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. त्या पाठोपाठच अनिलभाऊंनी आटपाडीसाठीही प्रयत्न करून श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला रुग्णवाहिका प्राप्त केली.आटपाडी येथे आमदार अनिलभाऊ बाबर,शिवसेना नेते तानाजीराव पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेनेचे अध्यक्ष पैलवान संतोषभाऊ पुजारी, दत्तात्रय पाटील (पंच), सरपंच गणेश खंदारे, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे,अॅड. धनंजय पाटील, मुन्नाभाई तांबोळी, बाळासाहेब होनराव, मनोज नांगरे,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, दत्तात्रय पाटील, नामदेव कदम, किशोर जाधव, शंकर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान तांबोळी,वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम, डॉ.किरण लाळे, डॉ.अशोक खरजे, डॉ.विनय पत्की,विजय देवकर,पोपटराव सूर्यवंशी,सागर ढोले, तानाजी चव्हाण,अभयसिंह पोकळे,आप्पासाहेब माळी,सुहास नवले,नंदकुमार कदम,मनोज देशपांडे,सुरज नवले,संतोष पाटील,बापूराव चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आटपाडी येथे रुग्णवाहिकेचे जंगी स्वागत करून लोकार्पण सोहळा व या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.कोरोना महामारीच्या कालावधीत गरजू रुग्णांसाठी या रुग्णवाहिकेची सेवा मोफत दिली जाणार आहे.त्याची संपूर्ण जबाबदारी युवासेनेचे तालुकाध्यक्ष पैलवान संतोषभाऊ पुजारी व दत्तात्रय पाटील (पंच) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. गरजू लोकांनी युवासेनेचे तालुकाध्यक्ष पैलवान संतोषभाऊ पुजारी मोबाईल नंबर 99 70 27 94 92 तसेच दत्तात्रय पाटील (पंच) मोबाईल नंबर 95 61 90 27 77  या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.