१२५६ कोरोनामुक्त; ३६ जणांचा मृत्यू तर १२१८ नवे पॉझिटिव्ह

सांगली जिल्हा : कोरोनायन दि.२८/०५/२०२१ 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.२८ रोजी १२५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.३६ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला असून नव्याने १२१९ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १२ हजार ७१५कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर ९९ हजार ३८३ रुग्ण बरे झाले असून ३३३७
 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १५ हजार ४३६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १९१४ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १६४४, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २५ आणि व्हेंटिलेटरवर २४५ रुग्ण आहेत.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.२८/०५/२०२१

आटपाडी २७ (मृत्यू १)
जत ९२ (मृत्यू ११)
कडेगाव १२७ (०)
कवठेमहांकाळ ७७ (१)
खानापूर ८१ (२)
मिरज १४० (२)
पलूस ७० (०)
शिराळा १४८ (०)
तासगाव १११ (३)
वाळवा १९४ (९)
सांगली,मिरज महानगरपालिका १५१
(सांगली-११८ ,मिरज-३३)
(मृत्यू: सांगली-६, मिरज-१ ,कुपवाड-०)
एकूण १२१८ (मृत्यू-३६)