
पदे येत असतात, जात असतात परंतु आपण माणुसकी किती कमावली? याला जास्त महत्त्व आहे: माजी आमदार दिपकआबा साळुंखे.
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: राजकारणामध्ये,समाजकारणामध्ये चांगली माणसं कमावणं, चांगलं, प्रामाणिक काम करणं जास्त महत्वाचं आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिपक आबा साळुंखे यांनी माळशिरस तालुक्यातील कण्हेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती रमेश पाटील यांचे चिरंजीव शंभूराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केले. पुढे बोलताना दीपकआबा साळुंखे म्हणाले की, रमेश पाटील यांचा शब्द कोणीही मोडू शकत नाही, कारण इतर चांगल्यापेक्षा रमेश पाटील यांची भीती सर्वांना वाटते. कारण ते कधी, कुठे,कसा निशाणा साधतील सांगता येत नाही. खूप वर्षांपासून कण्हेर येथील पाटीलवाड्याचा आणि पवार कुटुंबीयांचा फार निकटचा संबंध आहे. तसेच या कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्याची ताकद ईश्वर सर्वाना देवो, व लवकर हे संकट टळून माझा बळीराजा, जनता पूर्वीप्रमाणे सुखात राहो, सर्व पूर्ववत चालू होवो अशी सदिच्छा व्यक्त केली. आज खरच कोरोनासारख्या संकटाच्या काळात आपल्या चिरंजीवांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम रमेश पाटील यांनी केले आहे, अशा शब्दात यांचे कौतुकही केले आणि चिरंजीव शंभूराजे रमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, सर्व रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले.
या कार्यक्रमास रेल्वे संघर्ष समितीचे सोमनाथ अण्णा वाघमोडे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास भाऊ पाटील, अॅड. कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे इंद्रजीत रुपनवर, अक्षय भांड, पंचायत समितीचे सदस्य गौतम माने, भानुदास सालगुडे पाटील, पोपट माने, बाबासाहेब माने, पोलीस पाटील नितीन पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद