
*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.२५/०५/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि.२५ रोजी तालुक्यात ११९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर ५६ नवे पॉझिटिव्ह सापडले आहे.आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८ पुरुष असून २८ स्त्रियांचा समावेश आहे. अँटीजन चाचणीद्वारे ४५ व आर टी पी सी आर चाचणीद्वारे ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ४८ रुग्णांचा व तालुक्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे दुप्पट व दिलासादायक आहे.आटपाडीचे तहसीलदार तथा तालुका इन्सिडंट कमांडर सचिन मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान तांबोळी,तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय स्टाफ यांच्या रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी यश येऊ लागले आहे.नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२५ मे,२०२१)
आटपाडी 9
झरे 2
दिघंची 5
विठलापुर 1
लिंगीवरे 4
करगणी 2
शेटफळे 2
कौठुळी 1
उंबरगाव 4
लेंगरेवाडी 1
खरसुंडी 2
औटेवाडी 2
घानंद 1
घरनिंकी 5
हिवतड 1
जांभुळणी 2
आंबेवाडी 2
बनपुरी 1
खानजोडवाडी 1
चोपडी 2
खवासपूर 4
वायफळे 1
सातारकरवस्ती 1

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर