

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /धरणगाव:
धरणगाव तालुक्यातील भोद येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्नी व मुलीसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली. तापी नदीत उडी घेऊन ही आत्महत्या केली. राजेंद्र पाटील हे धरणगाव एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालकही होते.त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
धरणगाव तालुक्यातील राजेंद्र रायभान पाटील (वय 54 वर्षे), त्यांची पत्नी सौ.वंदना राजेंद्र पाटील (वय 48 वर्षे) व मुलगी म्याॅनल राजेंद्र पाटील (वय 21 वर्षे) हे तिघेजण टाटा इंडिका गाडीमधून (गाडी नंबर एम एच 19 ए पी 1094) दि.१७ मो रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या गावाला गेले होते. राजेंद्र यांची ती सासरवाडी आहे.उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी ते पत्नी व मुलगी समवेत सासरवाडीला गेले होते.
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते भोद येथे परत येण्यासाठी निघाले होते. परंतु ते तेथे पोहोचले नाहीत. दरम्यान सायंकाळी त्यांची गाडी सिंदखेड तालुक्यातील दभाशी नदीच्या पुलावर असलेली आढळून आली. दोन दिवस ती गाडी तिथेच होती.दि.१८ मे रोजी सायंकाळी चार वाजता त्यांचा मृतदेह तापी नदीत तरंगताना दिसला. नंतर रात्री त्यांच्या मुलीचाही मृतदेह तरंगताना दिसला. मात्र पत्नीचा मृतदेह आढळून आला नाही.त्याची शोध मोहीम सुरू होती.भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले. राजेंद्र पाटील यांनी पत्नी व मुलगी यांच्यासमवेत दभाशी नदीच्या पुलावरून तापी नदीत उडी घेतली. भारतीय जनता पार्टीचे ते धरणगाव तालुका उपाध्यक्ष होते.तसेच धरणगाव एरंडोली शेतकी संघाचे ते संचालक होते.त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या