उद्योजक सुभाष सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख रुपये किंमतीचे मेडिकल साहित्य प्रदान

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडीसारख्या दुष्काळी भागात जन्माला येऊन खडतर परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर शिक्षण पुर्ण करुन पुणे, मुंबई येथे  व्यवसायात  यशस्वी जम बसवून समाजसेवेचे व दातृत्वाचे वृत्त जपणारा राजेवाडी येथील उद्योजक सुभाष सातपुते या युवकाची लीलाच न्यारी आहे.
       कोरोना महामारीच्या काळात शहरी भागासोबत  ग्रामीण भागातही कोरोनाने भयंकर रूप धारण केले असताना आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता एक सामाजिक बांधिलकी या नात्याने  स्वत:चे जन्मगाव असलेल्या राजेवाडी ग्रामपंचायतसोबत माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फाऊंडेशनच्या सहकार्याने वरकुटे-मलवडी ता .माण  येथील  100 बेड उपलब्ध असलेल्या संकल्प कोविड सेंटरला  व बोंबेवाडी येथील ग्रामपंचायत या तिन्ही ठिकाणी  एक लाख रुपये किंमतीचे टेम्परेचर मशीन, आँक्सिमीटर मशीन, सैनिटाएझर , हँड वॉश, 5000 मास्क, विविध गोळ्या औषधाचे वाटप करुन पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या संकटात भरीव योगदान दिले आहे.            कोरोनाच्या पहिल्या व दुसरा  लाटेत नेहमी अग्रेसर राहुन सुभाष सातपुते अँड कंपनीच्या वतीने  ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत पाच लाख रुपयाची मदत करुन  विविध माध्यमातून विविध ठिकाणी  केली आहे.कोरोना काळात वाढदिवस अशा मदतीने साजरा केल्याने त्यांच्यावर सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव  होत आहे.यावेळी उद्योजक सातपुते म्हणाले की, सध्याच्या काळात आपल्यातील माणुसकी जीवंत ठेवून प्रत्येकाने जमेल तितकी मदत करुन कोरोनाशी लढा द्यावा.यावेळी उद्योजक धीरज जगताप,प्रशांत खरात,संजय जगताप,सचिन आटपाडकर,सुधीर विभुते,सुनिल थोरात,साहेबराव खरात, सरपंच संजय खिलारी, सरपंच विजय जगताप,सचिव भागवत अनुसे,विक्रम शिंगाडे, डी.जी. बनगर, श्री श्री उद्योगसमुहाचे पांडुरंग कोडलकर,उपसरपंच सुरेश शिरकांडे,ग्रामसेवक दत्तात्रय गळवे आदि मान्यवर उपस्थित होते.