माळशिरसचा वकील बनलायं रुग्णांसाठी देवदूत! स्वतःच्या चारचाकीतूनच पुरवतोय अँम्ब्युलन्सरुपी सेवा!

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

समाजाचे शिल्पकार म्हणजेच शिक्षक,वकील,डॉक्टर,सामाजिक कार्यकर्ते.यातील अनेकजण स्वतः व स्वतःच्या परिवारासाठी जगतात,तर काहीजण स्वत:साठी कधीच जगत नाहीत.तर समाजाचे उज्ज्वल भवितव्य ऊर्जावान बनविण्यासाठी जगतात.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.शिक्षणाने समाज परिवर्तनासाठी पुढे येणारच. चांगले शिक्षण अनेकांना बदलू शकते.तर एक चांगला व्यक्ती सर्वकाही बदलू शकतो.आजच्या स्वार्थी आणि व्यापारीकरणाच्या जगात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असाच एक वकील कोरोना महामारीविरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांना तसेच इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात पोहोच करत आहे.यामुळे ते अनेकांसाठी देवदूतच बनत आहेत.ते अनेक दिवसांपासून समाजकारण व राजकारणामध्ये सक्रिय आहेत. गाव व परिसरातील एखाद्या नागरिकानं रुग्णवाहिकेसाठी फोन लावावा, हा वकील स्वतःची  रुग्णवाहिका बनवलेली गाडीच घेऊन हजर होतो. या वकीलाचं नाव आहे ॲड.संजय रामचंद्र माने.ते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते असून मोटेवाडी ग्रामपंचायतचे सदस्यदेखील आहेत.ज्यांना वेळेवर गाडी भेटत नाही,त्यांनी आवर्जून 9960812222 या क्रमांकावरसंपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
खेड्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी धावपळ झालेली पहायला मिळते. त्यामुळे या वकिलाने स्वतःच्या  चार चाकी गाडीची आता मोफत रुग्णवाहिका बनवली आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे वाहने पूर्णपणे बंद असून अनेक रुग्णांना वाहनाअभावी दवाखान्यात वेळेवर पोहोचता येत नाही.याचा अनेक रुग्णांना त्रास झालेला पाहून स्वतःची चारचाकी गाडी रुग्णांसाठी मोफत सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यांच्या या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
प्रत्येकांनी दुसऱ्याच्या मदतीची वाट न बघता प्रत्येकांनी शक्य तेवढे पुढे आले तर कोरोनासारख्या महामारीला आपण गावच्या वेशीवरच रोखू.लॉकडाऊनमध्ये लाखोजणांचे रोजगार गेले,उद्योग बंद पडले,अनेकजणांचे हातावर पोट आहे,यांनी कसे जगायचे? यांचं कसं पोट भरणार? त्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली पाहिजे.सर्वांनी ‘माझा कुटुंब,माझा समाज’ म्हणत एकजुटीने महामारीविरोद्ध उभं राहिलं पाहिजे,असं आवाहन त्यांनी  केलं आहे.