पालकमंत्री दत्तामामांनी केले कोविड केअर सेंटरचे उद्घाटन!

माळशिरस शहरात ३५ बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस शहरात म्हसवड रोड येथे माळशिरस कोविड केअर हॉस्पिटल व सुमंगल कार्यालय अकलूज रोड येथे धन्वंतरी कोविड केअर हॉस्पिटल या दोन्ही कोविड सेंटरचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.एम.के.इनामदार,प्रांताधिकारी शमा पवार,गटविकास अधिकारी स्मिता पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते,माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष डॉ.मारुती पाटील,तुकाराम देशमुख,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य रमेश पाटील,गणपतराव देशमुख,सोमनाथ वाघमोडे,बाळासाहेब सरगर,महादेव देशमुख,पांडुरंग वाघमोडे,दादा हुलगे,कोविड केअर सेंटरचे डॉ.दत्तात्रय सर्जे,डॉ.नितीन वाघमोडे,डॉ.दिलीप वाघमोडे,डॉ.अनिल पाटील,डॉ.सिद,डॉ.मच्छिंद्र गोरड,डॉ.सचिन केमकर व डॉ. अनिल पाटील, डॉ.नितीन वाघमोडे, डॉ.नितीन सिद,डॉ.पंकज नलवडे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.सचिन सावंत व सर्व हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होता.          यावेळी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी कोरोना रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचण विचारत घाबरून न जाता वेळेत उपचार घेतल्याने कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास त्यांनी रुग्णांना देत धीर दिला.या नवीन कोविड केअर सेंटरमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची उपचारासाठी मोठी सोय झाली असून,यामुळे कोरोना रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होणार आहेत.या सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.या दोन्ही हॉस्पिटलमध्ये ३५ बेड असून आयसोलेशनसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी डॉ.सर्जे म्हणाले, कोरोना रुग्णांनी या आजाराला घाबरून न जाता वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपलेला असलेल्या कोरोनाच्या प्राथमिक लक्षणाबाबत वेळेत औषध उपचार सुरु ठेवावा, यामुळे कोरोनामधून रुग्ण मुक्ती मिळवू शकतात.