आटपाडी तालुक्यात आज सापडले 133 कोरोना पॉझिटिव्ह!

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज पुन्हा कोरोनाने चढाई केली असून आज 133 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये  अँटीजन चाचणीद्वारे 86 व आरटीपीसीआर चाचणीद्वारे 47  जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुरुषांची संख्या 63 असून पॉझिटिव्ह 70 महिलांचा समावेश आहे. दिलासा देणारा या आठवड्यातील अहवाल असतानाच पुन्हा संख्या 133 वर पोहोचली आहे. आटपाडीमध्ये 27, दिघंचीमध्ये 20 तर राजेवाडीमध्ये 15 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. आज पालकमंत्र्यांनी पुढील तीन दिवसांचे कडक लॉकडाऊन लागू केले असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे. तालुका प्रशासन व आरोग्य विभाग यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी)

आटपाडी 27 आवळाई 3 पुजारवाडी(आ)1 बनपुरी 2  बोंबेवाडी 2  चिंचाळे 1  देशमुखवाडी 1  दिघंची 20  वलवण 1 विठ्ठलापूर 3  यपावाडी 2  गळवेवाडी 1  हिवतड 1  झरे 1  कानकात्रेवाडी 4  करगणी 1  कौठुळी 4  खानजोडवाडी 2  खरसुंडी 3  मापटेमळा 1  नेलकरंजी 1  निंबवडे 3  पळसखेल 1  पिंपरी बुद्रुक 1  राजेवाडी 15  शेटफळे 4 उंबरगाव 12 तसेच इतर गावाहून तालुक्यात गोंदवले 1, कोळे 1 व लोटेवाडी 12 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.