
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
सध्या कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे.प्रशासन हतबल झाले आहे.आरोग्य सेवक अहोरात्र प्रयत्न करत आहेत.त्यांच्या कष्टाला यश येत आहे. मात्र रुग्ण वाढीमुळे समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे यावे, प्रशासनाला मदत करावी या भावनेतून व आपल्या समाजाला आपण काही तरी देणे लागतो , आपल्या समाज बांधवांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी माडगूळे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व माडगूळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष अमोलशेठ भालचंद्र विभुते यांनी स्वखर्चातून ३५ हजार रुपये खर्चून माडगुळे गावात सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.त्यांनी स्वतः प्रत्येक घरी जाऊन हे वाटप केले.
माडगुळे गावचे माजी सरपंच संजय विभुते,उद्धव विभुते,राहुल विभुते,सुनील विभुते,प्रा. शैलेश विभुते,समीर विभुते,मेजर सतीश विभुते,बापू केंगार,नवनाथ मंडले, उमेश लिंगडे, नितीन लिंगडे, बीडीएस बँकेचे शाखाधिकारी महेश लिंगडे,उमेश लिंगडे,तुषार विभुते,सचिन विभुते,अमोल विभुते व गावातील तरुण उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद