स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/टिटवाळा:

आपलं सामाजिक दायित्व समजून स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाने लाॅकडाऊनच्या काळात अनेक महिलांना रोजगार देण्याचे काम केले.नवीन रोजगार निर्मिती करुन काम देण्याच्या उद्देशाने रणरागिणी रुचिता स्नॅक्स सेंटर टीटवाळ्यात सुरु करण्यात आले. डाॅक्टरांच्या सल्यानुसार रणरागिणी रुग्ण नर्स सेवा कमी किंमतीमध्ये उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या कठिण प्रसंगात नागरीकांचे मनोबल स्थिर राहण्यासाठी व महिलांचे नैराश्य कमी व्हावे म्हणुन स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ ऑनलाईन स्पर्धा व विविध उपक्रम राबवून नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना काळात प्लाझ्मा डोनर,रक्तदाता शोधण्याचे काम मंडळ करत असते.स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ सौ.सुप्रिया आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या मंडळामार्फत केल्या जाणा-या कार्याचे टीटवाळा शहरात कौतुक केले जात आहे.