दिघंचीत स्व.गजेंद्र ढोले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा.आरोग्य केंद्रात गोळ्यांचा पुरवठा व वाटप

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिघंची:

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील गलाई बांधव अंकुश ढोले यांचे वडील स्व.गजेंद्र धोंडीराम ढोले( कदम) यांच्या तृतीय  पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली. यानिमित्त अंकुश ढोले यांनी रुग्णांना आवश्यक असणाऱ्या व सध्या आरोग्य केंद्रांना  कमतरता भासणार्‍या पॅरासिटॅमॉलसारख्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. युवा नेते रोहित देशमुख यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राला या गोळ्या देण्यात आल्या.

दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डाॅ. विनायक पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या पुरवण्यात आल्या. यावेळी संभाजी ढोले, युवा नेते रोहित हणमंतराव देशमुख, राजकुमार पडळे, अतुल जावीर,समाधान भोसले, अजिनाथ जावीर,सुरज यादव (भैया) बुधावले, भिमराव जाधव,अजय मंडले आदी उपस्थित होते. सध्या पॅरासिटॅमॉलसारख्या नियमितपणे लागणाऱ्या गोळ्यांचा आरोग्य केंद्रांना तुटवडा पडत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी समाजातील काही दानशूर व्यक्ती, तसेच वाढदिवस साजरा करणारे व्यक्ती यांना या गोळ्यांचा पुरवठा करून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वर्गीय गजेंद्र ढोले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राला या गोळ्या पुरवण्यात आल्या आहेत. केंद्रातील वैद्यकीय स्टाफने त्यांचे आभार मानले.