
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
आजकाल वाढदिवसानिमित्त अनेक तरुण-तरुणी भर रस्त्यावर केक कापून, तो चेहऱ्याला फासून, एकमेकांना अंडी मारून,फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता, भारताच्या महान संस्कृतीचा लोप होताना दिसत आहे. तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसून येते. मात्र स्वत:च्या वाढदिवशी केक न कापता गोरगरिबांना सॅनिटायझर वाटप करून,वृक्षारोपण करणारी तरुणाई पाहता समाजाबद्दलची आत्मियता, समाज सुधारण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या पिढीचे आदर्श दर्शन घडते.
मोटेवाडीचे सरपंच व भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुकाअध्यक्ष प्रा.दादासाहेब खरात यांचा वाढदिवस सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून व कोरोनाच्या नियमाचे पालन करून, अगदी साध्यापणाने 3 फुटी उंचीची रोपे लावून केला.तसेच गावातील अनेक गरीब कुटुंबाना सॅनिटायझरचे वाटप केले.यावेळी दादासाहेब खरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच मी जिवंत आहे, तोपर्यंत गावात झाडे लावणार आहे,अशी शपथ त्यांनी घेतली.यावेळी गावातील अनेक तरुण उपस्थित होते. कृषी उद्योजक ज्ञानदेव कोळेकर, राष्ट्रवादीचे युवा नेते हनुमंत नामदास,सागर ठेंगल,महेंद्र माने,सत्यवान केंगार,प्रदीप नामदास,दादा वायदंडे, दत्तू वायदंडे इत्यादी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद