राजेवाडीतील ‘गवळण’ हरपली! सौ.इंदुबाई लक्ष्मण हेगडे यांचे कोरोनाने निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/राजेवाडी:

राजेवाडी येथील सर्वच सांप्रदाय कार्यक्रमामध्ये भजन ,गवळण,पाळणा,म्हणणारी ‘गवळण’, आज हरपली. त्याचे कोरोनाने उपचारादरम्यान आज दुःखद निधन झाले.सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा हद्दीवर असलेल्या राजेवाडीसारख्या सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावामध्ये बाळंतपणाची आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हजारो मातांची घरगुती सुखरुप बाळंतपण त्यांनी केली होती. खात्रीशीर सुईन म्हणून  त्यांचा या मातांना आधार होता.जन्मलेल्या त्याच बाळाचे पुढे पाळण्याचे गायन करणाऱ्या इंदुबाई हेगडे यांच्यावर काळाने आज झडप घातली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.त्यांच्या पश्चातपती लक्ष्मण,दोन मुले भानुदास व बळीराम,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.