श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेकडून तातडीने मदत
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यातील तुर्क आसंगी येथे भिमु दऱ्याप्पा दलवाई यांच्या झोपडीवजा घरावर वीज कोसळून झोपडी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना तातडीने तुर्क आसंगी येथे पोहचली व चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते दळवाई कुटूंबियांना रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला.शुक्रवारी पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात तुर्क आसंगी येथील भिमु दऱ्याप्पा दळवाई यांच्या झोपडीवजा घरावर वीज कोसळून झोपडी जळून खाक झाली. या दुर्घटनेत भिमु दळवाई यांच्या छप्परवजा घरातील रोख रक्कम २० हजार रुपयांसह ज्वारी,गहू,कपडेलत्ते व संसार उपयोगी साहित्य, सर्व जळून खाक झाले. सुदैवाने घरात कोण नसल्यामुळे जिवीतहानी टळली.या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे बाबा असंगी , मिरसाहेब मुजावर , अफजल मुजावर, सद्दाम मुजावर ,संजय चव्हाण , परमेश्वर कोडग , बाळू डोंबळे, श्रवण बरकडे, नवनाथ नारळे, भिमु दलवाई , संतोष वाघे, तानाजी वाघे , सचिन कोडग , तुर्क आसंगीचे पोलीस पाटील आशपक पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली व या घटनेची माहिती तुकाराम बाबा महाराज यांना देत मदतीची मागणी केली.तुर्क आसंगी येथील घटनेची माहिती मिळताच तुकाराम बाबा महाराज यांनी तुर्क आसंगी गाठत भिमु दळवाई व त्यांच्या पत्नी सखूबाई दळवाई यांची भेट घेतली. त्यांना धीर देत रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य भेट दिले. यावेळी त्यांच्यासमवेत मोटेवाडीचे मानव मित्र बाळासाहेब मोटे, गोंधळेवाडीचे मानव मित्र सोहन धुमाळ उपस्थित होते.ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या मदतीमुळे दळवाई कुटुंबास लाख मोलाची मदत झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद