
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
गोरडवाडीतील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ तुकाराम कर्णवर हे सध्या वाहतूक उपविभाग नारपोली,भिवंडी,ठाणे शहर याठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक काम करताना कोरोनामध्ये फुटपाथवर दूर राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे उपयोगी किट ,मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.त्यांची कन्या स्वरांजली हीचा ५ वा वाढदिवस सत्यभामा गजानन देव अनाथ बालिकाश्रम,आनगाव ता.भिवंडी जि. ठाणे या ठिकाणी साजरा करण्यात आला . अनाथाश्रमात सर्व मुली असून वाढदिवसानिमित्त सर्वाना आवडीचे भोजन देऊन मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती रुपशिंगसेठ राजपुरोहित सह मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद