जागर फाऊंडेशनतर्फे जत शहरात सॅनीटायझर फवारणीचे उद्घाटन

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत शहरात जागर फाऊंडेशनच्या माध्यमातून परशुराम मोरे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चाने सॅनिटाइझर फवारणीचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विक्रम सावंत,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जि प सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराय बिरादार,बाबासाहेब कोडग,मारुती पवार,जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे,विक्रम ढोणे,आकाश बनसोडे उपस्थित होते.यावेळी बोलताना खा.संजयकाका पाटील म्हणाले, परशुराम मोरे यांच्या काम अतिशय चांगल आहे.आपल्याला मिळालेलं आयुष्य हे दुसऱ्याच्याही कामी यावं, त्यांच्या उपयोगी पडावे या भावनेतून ते समाजाचा चांगला प्रश्न घेऊन काम करत आहेत.परशुराम मोरे यांच्या आदर्श आणि प्रेरणा घेऊन या कोरोना महामारीच्या संकटातून कसे बाहेर येता येईल,यासाठी सामाजिक संस्था,ट्रस्ट या सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी आ विक्रम सावंत म्हणाले,परशुराम मोरे हे पहिल्यापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सर्वसामान्य लोकांसाठी आपल्यापरीने काय देऊ शकतो, ही भावना ठेऊन काम करत आहेत. ह्याच पद्धतीने तालुक्यातील इतर संस्थांनी काम करावे. यावेळी जागर फाऊंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.