प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सोलापूर :
सध्या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून कोरोना या रोगाने थैमान घातले असून राज्यातील सर्व मंत्रीमंडळ भरपूर कष्ट घेत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन गावातील सर्व सरपंचांना गावपातळीवर सक्षमपणे काम करण्यास सांगितले आहे. मात्र शासनाने गाव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना कोणत्याही प्रकारचे आरोग्य संरक्षण दिलेले नाही. सरपंच हा गावाचा प्रमुख घटक म्हणुन ओळखले जातात. त्यांना लवकरात लवकर आरोग्य संरक्षण द्यावे,अन्यथा काही झाल्यास राज्य शासन याला जबाबदार असेल व याची दखल मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री मंत्री जबाबदार असतील असा इशारा शिव सरपंच सेवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांनी दिला आहे. प्रत्येक गावाला महाराष्ट्र सरकारने 10 लाख रुपये निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. गावात उन्हाळा सुरू असल्याने गावात पाणीटंचाई असताना यात हा कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.म्हणून सर्व सरपंचांची राज्य शासनाने कोरोना योद्धा म्हणून नोंद घ्यावी, अशी मागणीही नितीन काळे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद