नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व कोरोना रुग्णाला लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मदत म्हणून माडगुळे ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल विभुते,भारत जगन्नाथ विभुते,नितीन लिंगडे यांनी माडगुळे येथे रक्तदान शिबीर आयोजित केले. हर्षवर्धन देशमुख यांनी दिपप्रज्वलन केले.माडगुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय विभूते यांनी थोर साहित्यिक ग.दि.माडगूळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.सांगली जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे,ऋषिकेश देशमुख,प्रा.शैलेश विभुते,सुनील हरिदास विभुते,पवन विभुते,प्रा.राजेंद्र कंडरे,प्रा.प्रसाद विभुते,यशवंत खळगे,मुस्तफा इनामदार,सचिन विभुते,सचिन कंडरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. गदिमा पारावर हे रक्तदान शिबीर पार पडले.यात एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबीरास सांगोला येथील रेवनिल ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद