प्रेमसंबंधातून दरीबडचीतील युवकाचा खून

पांढरेवाडी फाट्याजवळील घटना;दोन संशयित आरोपी ताब्यात
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

दरीबडची ता.जत येथील युवकाचा प्रेम संबंधाच्या कारणाने धारदार शस्त्राने खून करण्यात आला. धनाजी भागप्पा टेंगले (वय १९ रा.टेंंगले वस्ती ) असे  मयत युवकाचे नाव आहे.ही घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजता घडली.यामध्ये दोन संशयित आरोपी आदीनाथ हक्के (वय १९ वर्षे, रा.खंडनाळ),संशयित आरोपी राजु बाळू लेंगरे (वय २१ वर्षे रा.पाढरेवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेली  माहिती अशी की, दरीबडची गावापासून पांढरेवाडी फाट्याजवळ मयत धनाजी भागाप्पा टेंगले आई-वडिलांसोबत राहत होता.धनाजी रात्री दूध घालण्यासाठी दरीबडची येथे एम एच ४५ के ०२८१ क्रमांकाच्या मोटरसायकल घेऊन गेला होता.दूध घालून परत येताना कुलाळवाडी दरीबडची रस्त्यावर गाडी अडवून धारधार शस्त्राने डोक्यात तीन वार, कानावरती वार करुन खून करण्यात आला.तसेच मोटारसायकल अंगावर टाकली होती.आरोपींनी हा अपघात भासविण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ४०० मीटर अंतरावर खून झाला आहे.गाडी आडवून तोंड दाबल्याने आवाज आला नाही.रस्त्यावर रात्री वर्दळ नसल्याने  घटनेची माहिती समजली नाही. रात्री १० वाजेपर्यंत धनाजी घरी आला नसल्यामुळे वडिलांनी शोधाशोध सुरू केली.रात्री साडेदहाच्या दरम्यान धनाजी टेंगले हा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला.त्याच्या डोक्यावर तीन वार,कानावर वार केलेले होते.तातडीने उपचारासाठी जत ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.परंतु डोक्याला कानावर वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने मृत्यू झाला.
रात्री घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
मयत धनाजी  टेंगले हा इयत्ता १२ वी कला शाखेत बहिस्थ शिक्षण घेत होता.आई-वडील ऊसतोडणी मजुरीचे काम करतात.भाऊ बिहार येथे सोने-चांदी दुकानात कामाला आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,बहिण,भाऊ असा परिवार आहे.
  संशयित आरोपीला जत पोलीसांनी घटनास्थळी तपासासाठी आणलेे होते. अधिक तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण केले होते.श्वान जागेवर घुटमळून संशयित आरोपीजवळ थांबले.मृतदेह शवविच्छेदन करुन कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.वडील
भागाप्पा धाऊबा टेंगले यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते करीत आहेत.