वंचित बहुजन आघाडीतर्फे आटपाडी तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आटपाडी व विठ्ठलापूर येथे महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याहस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका खंदारे,संतोष सावंत,आबासाहेब नामदास,दीपक सावंत,समाधान सावंत उपस्थित होते.
राजश्री शाहू विचारमंच, विठलापूर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाळासाहेब वाघमारे,सचिन सावंत,नवनाथ जावीर, तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,संतोष सावंत,सुभाष सावंत,नंदकुमार सावंत,राजकुमार सावंत उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या आटपाडी येथील संपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आटपाडी तहसील कार्यालयाचे किशोर चिंचोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ‘वंचित’चे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,जनार्दन सावंत,शैलेंद्र ऐवळे,महेश काटे,आकाश काटे उपस्थित होते.
सिद्धार्थनगर कॉलनी येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुहास मोरे,दीपक तोरणे,सूर्यकांत खरात,मिलिंद ठोकळे यांच्या निवासस्थानी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी मिलिंद ठोकळे अश्विन ठोकळे, साहेबराव चंदनशिवे, सचिन सावंत, दीपक सावंत, ऋतिक सावंत, सचिन चंदनशिवे उपस्थित होते.