अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला प्रेरक आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे तरुणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल करावी,असे प्रतिपादन युवक नेते शंकरराव वगरे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अंकले येथे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शंकराव वगरे,सरपंच संगीता चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक, ग्रामपंचायत सदस्य यशवंत दुधाळ, युवा नेते राजू चौगुले, रासप नेते लक्ष्मण पुजारी,धनाजी दुधाळ,दादा दुधाळ,देवानंद चंदनशिवे,कुलदीप चंदनशिवे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद