कोरोना काळात रक्तावाचून कुणाचा जीव जावू नये म्हणून तरुणाईने पुढे यावे: अध्यक्ष सुभाष सातपुते यांचे मत

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे दि.11 :

राज्यात एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याच्या धर्तीवर, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करुन स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील भरारी ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 178 रक्तदात्यांनी रक्तदान करुन मोठा प्रतिसाद दिला.
रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार असेल तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने तरूणाईने रक्तदान करायलाच हवे असा संकल्प भरारी ग्रुपच्या वतीने कोरोना महामारी काळात केला आहे.कोरोना या विषाणूने जगात थैमान घातल्याने कोरोना बाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासू लागली आहे.राज्यातील सर्व रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढयामधे रक्तसाठा अल्प प्रमाणात आहे.रक्तदान ही काळाची गरज आहे.कारण विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी रक्त तयार करता येता येणार नाही. त्यामुळे रक्तपुरवठ्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आज भरारी ग्रुपच्या वतीने शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या सहकार्याने सोमेश्वर मंदीर, बाणेर येथे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
कोरोना काळातील सर्व सोशल डिस्टनसचे नियम पाळुन 178 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला. या सर्व रक्तदात्यांना मास्क व सेनिटाइझरचे मोफत वाटप करण्यात आले. सदर नियोजित शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी ठेवण्यात आली होती. या रक्तदान शिबिरामधे 41 नवीन रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले.या शिबीरात पोलिस,युवक युवती व नागरिक यांनी आवर्जून सहभाग नोंदविला.सदर शिबिरास पोलीस अधिकारी शिंदे साहेब, काशीद साहेब, आय आर बी चे रिजनल मॅनेजर प्रदीप शहा साहेब, चार्टर्ड अकाउंटट सचिन वास्कर साहेब, साहेब , डॉ. विनित गांधी, आम्ही सांगलीकरचे अध्यक्ष अरुण कदम आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन भरारी ग्रुपच्या या कार्याचे कौतुक केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भरारी ग्रुपचे दिपक पाटील, विनित शिंदे, प्रशांत पाटील,शैलेश घाडगे, स्वप्निल डोळस,विशाल पाटील, भगवान खसे, रोहन तावरे ,संतोष इंगळे,महेश कदम,नामदेव शेलार, रविंद्र कोथेरे, ऐश्वर्या पुजारी, वृषाली राजहंस, शुभदा भोसले,आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजन भरारी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष सातपुते यांंनी केले होते.