सुभाष सातपुते ‘एनयुजे महाराष्ट्र’च्या राज्य पुरस्काराने सन्मानित

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सुभाष सातपुते अँड कंपनीचे संस्थापक चेअरमन व भरारी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष सातपुते यांना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने ‘पर्यावरण रक्षण व युवा संघटन’ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘एन यु जे महाराष्ट्र सन्मान 2021’ कार्यक्रमात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्य अध्यक्षा शीतल करदेकर,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ.सुभाष सामंत,सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव खटके, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य अरुणराव इंगवले,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण आढाव, विनयकुमार पाटील, शेखर घोंगडे, भुपेश कुंभार, जितेंद्र पाटील, पोपट वाकसे, सुनील सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुभाष सातपुते यांनी ‘कमवा व शिका’ योजनेमध्ये काम करून शिक्षण घेतले. राहण्यासाठी सुर्या केमिकलचे श्री मारुती खरात मामा यांनी पुण्यात आश्रय दिला. शिक्षणाच्या उद्देशाने विद्येच्या माहेरघरात पाऊल टाकले. शिकताना शहरात मोठ्या प्रमाणात पर्यावरण,शिक्षण, भ्रष्टाचार या सर्वातून अस्वस्थ मन जागे झाले.जाणीव झाली ते हे सर्व थांबवण्याची गरज असल्याची. आणि त्यातूनच भरारी ग्रुपची स्थापना जागतिक युवादिनानिमित 12 जानेवारी, 2008 साली स्वामी विवेकानंद जयंती दिनी समविचारी 11 युवक मित्र-मैत्रिणींनी एकत्रीत येऊन केली. 
स्थापनेपासून मग पर्यावरण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यातील विविध संस्थेची कॉलेजची माहिती देणे, प्रत्येक रविवारी शहरालगतच्या मुळशी,भोर, दौंड तालुक्यातील गावात जाऊन गाव स्वच्छता करून व्यसनाविषयी जनजागृती केली.त्याच सोबत रक्तदान, भ्रष्टाचार व दहशतवादास विरोध करून युवकांना एकत्र करणे व अशा असंख्य सामाजिक उपक्रमांना पाठींबा देऊन ते यशस्वीपणे राबवण्याचे काम पुणे शहरात २३० युवकांचा सहभाग असलेला भरारी ग्रुप करतो आहे. 
ज्या क्षणी आपल्यासमोर अन्याय घडत आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत नाही, तो क्षण म्हणजे आपल्याला आलेले अपयश असते, हा विचार डोक्यात ठेऊन स्वतः शून्यातून सुरुवात केलेला भरारी ग्रुप आता फिनिक्स पक्षाप्रमाणे आपले अस्तित्व आपल्या सामाजिक व व्यावसाईक जाणीवेतून प्रकट करत आहे. 
प्रमुख सामाजिक उपक्रम :- 
१) २६/११ मुंबई हल्यात शहीद झालेल्या १८१ लोकांना १८१ युवकांनी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पित केली. 
२) आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भरारी ग्रुपच्या 3700 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. 
३) ३१ डिसेंबर व नववर्षाचे स्वागत युवावर्ग दारू पिऊन करतो.त्यासाठी महाराष्ट्रात प्रथम २००९ सालापासून ‘दारू नको,दुध प्या’ अभियानाचे नियोजन करून जनजागृती केली. 
४) २६/११ च्या हल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी यांची २०१० साली त्यांचे योगदान अमर रहावे या उद्देशाने त्यांच्या फोटोची आकर्षक दिनदर्शिका ५००० प्रतीत छापली.त्या दिनदर्शिकेची दखल तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी घेतली. सदर दिनदर्शिकेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते केले. 
५) भरारी ग्रुपने आतापर्यंत 485 विद्यार्थांना पुणे शहरात पार्ट टाइम जॉब मिळवून दिले आहेत. 
६) ग्रुप स्थापनेपासून आत्तापर्यंत प्रत्येक गणेशोत्सव कार्यक्रमात पुणे शहरात ग्रुपचे ५० युवक ९ दिवस ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करतात. 
७) २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी लोक उत्साहाने तिरंगा झेंडा घेतात व नंतर तोच तिरंगा रोडवर आढळून येतो.त्याबाबत जनजागृती म्हणून ‘झेंडा उचला अभियान’ सुरु केले. 
८) आजपर्यंत ‘भरारी ग्रुप’ने पुणे शहरातील हनुमान टेकडी, वनदेवी परिसर, भांबूर्डा वनिकरणात एकूण छोटी-मोठी 7500 झाडे लावून ती जागवण्यात आली आहेत. 
९) त्याचबरोबर दहशदवाद विरोधी होळी, गुटख्याची होळी असे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. 
       या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन २०१३ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते ‘आदर्श युवा’ पुरस्काराने सन्मानित.
२०११ ते २०१४ शिवाजीनगरचे आमदार यांच्याकडे त्यांचे शासकीय स्वीय सहायक म्हणून काम पहिले. 
२०१५ साली ‘सुभाष सातपुते अँड कंपनी’ ची स्थापना करून सार्वजनिक बांधकाम विभागाची पाटण तालुक्यात रोड, ब्रिजची कामे करण्यात आली. 
१६ जून २०१८ लग्न.
२०१८ पासून पुणे,मुंबई या भागात बांधकाम क्षेत्रात जोमाने सुरुवात.नुकतेच काळाची पावले लक्षात घेवून ‘सुभाष सातपुते अँड कंपनी’  साठी स्वतःचे ऑफिस खारघर येथे विकत घेतेले असून लवकरच उद्घाटन घेऊन कंपनीची पुढील वाटचाल पदोपदी वाढवत चाललेली आहे….!!!
कोरोना काळात एक सामाजिक बांधिलकी या नात्याने ‘सुभाष सातपुते अँड कंपनी’च्या वतीने आटपाडी तालुक्यात हैद्राबाद व राज्यस्थान येथील अडकलेल्या मजुर लोकांना व पुणे येथे अडकलेल्या परप्रांतिय 750 कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप व मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या आव्हानाला त्वरित प्रतिसाद देत दोन ठिकाणी रक्तदान शिबीर घेवुन 750 रक्त पिशिव्यांचे संकलन. त्याचबरोबर स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसानिमित पनवेल महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस यांना  2000 ( N95 मास्क)  चे मोफत वाटप  करण्यात आले. स्वत:च्या 31 व्या वाढदिवसानिमित्त अनाथाची माई सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथलयात जाऊन 31,000 रुपयांचा चेक व तेथील मुलाना जेवण देण्यात आले.कोकणात आलेल्या चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे मोफत वाटप करण्यात आले. सध्या नवी मुंबई मध्ये Paradise Group, Arihant Group व kamdhenu Group मध्ये गुणवत्तेच्या जोरावरती यशस्वी व्यावसायिक वाटचाल सुरु.
कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेवुन दिल्ली, गुजरात, राज्यस्थान व महाराष्ट्रातील 50 विविध नामांकित संस्थांनी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले आहे.