अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहर तालुक्याचे ठिकाण असून महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्याच्या सरहद्दीवर वसलेले दोन अक्षरी असलेले गाव म्हणजे जत. या शहराला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.या शहरांमध्ये डफळे घराण्याचा राजवाडा, जुना राजवाडा, सध्या चिनगी बाबाचे मंदिर, रामराव हायस्कूल ,यल्लमा देवी मंदिर, अंबिका देवी मंदिर,इनाम मळा, त्याचबरोबर जत वाचनालय समोरील कमान गेट व बुरुज या वास्तूस ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.काळाच्या ओघात या वास्तू काही प्रमाणात जीर्ण झालेल्या आहेत.विशेषत: कमान गेट, बुरुज या वास्तूचे किरकोळ दुरुस्तीचे काम व रंगरंगोटी काम चालू आहे.सदरचे काम बाल प्रकाश गणेश उत्सव मंडळाने हाती घेतले आहे.या कामास महाराष्ट्र कामगार सेनेने रंगाचे साहित्य देऊन सहकार्य केलेले आहे. सदर ऐतिहासिक वास्तूचे जतन करून पुढील नवीन पिढीस मार्गदर्शक ठरेल, प्रेरणादायी ठरेल,यासाठी या वास्तुंचे जतन व्हावे,असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की,आपल्या जत शहराला ऐतिहासिक वारसा प्राप्त झालेला आहे आणि तो नागरिकांनी जतन करावयाचा आहे. त्याचबरोबर माझे जत शहर सुंदर शहर करावयाचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करून हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा असे प्रतिपादन केले.
यावेळी बाल प्रकाश गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी,सुभाष कोळी, अनिल कोळी,मनोहर कोळी,अशोक गायकवाड, युवराज निकम, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनोहर कोळी यांनी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु