वन विभागाला अतिक्रमण काढण्यास यश

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावातील वनजमिनीवरील फॉरेस्ट गट नबंर ६०३ मधील गेली अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन ड्रीप व मल्चिंग करून तसेच वांगी, मिरची,ऊस शेती पिकवली जात होती. या क्षेत्रामध्ये फॉरेस्ट विभागाच्या हद्दीखुणा होत्या. तरीही या क्षेत्रामधील अतिक्रम काढले नव्हते.परंतु सध्या चालू वर्षात जून महिन्यामध्ये ६०३ गटामध्ये रोप लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे वन अधिकारी,वनरक्षक राजकुमार जाधव यांनी शेतकऱ्यांना बोलावून वन जमिनीचे महत्त्व, झाडाचे महत्त्व तसेच पर्यावरणाचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आली. ६०३ गटामध्ये एकुण क्षेत्र ३९.१३ हेक्टर आर पैकी अंदाजे पाऊण एकर क्षेत्रातील जेशीबीच्या साह्याने अतिक्रमण काढुन बांध बंधीस्त करून घेण्यात वन परिक्षेत्र अधिकारी माळशिरस विभागाला यश आले.