मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे साहित्यिक सुनील दबडे यांना नाशिकच्या तेजस फाऊंडेशनचा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .
फाऊंडेशनच्या अध्यक्षा मेघा डोळस यांनी पत्राव्दारे तसेच दूरध्वनीव्दारे याबाबत दबडे यांना कळविले आहे .
मंगळवार दिनांक १६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे .
सुनील दबडे यांनी अनेक बाल कुमार साहित्य संमेलनांची तसेच कवी संमेलनांची अध्यक्षपदे भुषविली आहेत . त्यांची ०४ पुस्तके प्रसिध्द असून त्यांना आतापर्यंत राज्यस्तरावरच्या अनेक साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानेही गौरविले आहे .
त्यांचे अनेक समाज प्रबोधनाचे कार्यक्रम रेडिओ व दूरदर्शनवरून प्रसारित झाले आहेत . अनेक सामाजिक विषयांना त्यांनी वृत्तपत्रातून वाचा फोडली आहे . समाजातील अंधश्रध्दा दूर व्हावी समाजात नवे विचार रुजावेत म्हणून दबडे यांनी आतापर्यंत शेकडो व्याख्याने दिली आहेत .
गोरगरिबांना , निराधारांना , विविध माध्यमातून प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे .
समाज घडविण्यासाठी विशेष करून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबविले आहेत . त्यांनी पुढाकार घेऊन अनेक साहित्य संमेलने भरविण्यासाठी प्रयत्न केले आहेत .
कोरोना संकट काळात त्यांचे समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित झाले आहेत.
दबडे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक