सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून फलटण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

सन्मती सेवा दल,फलटण शाखेच्यावतीने फलटण येथील रक्तपेढी,संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर शेजारी, फलटण येथे गुरुवार दि. २५ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
फलटण ब्लड बँकेकडून करण्यात आलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद देत प्रथमच श्री सन्मती सेवा दलाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
‌‌ ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रक्तदान या श्रेष्ठ कार्यास श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी-अकलूज, नुतन अध्यक्ष विरकुमार दोशी- सदाशिवनगर, माजी अध्यक्ष नवजीवन दोशी- वेळापूर उपस्थित होते.
डॉ.श्रीकांत करवा,डॉ. संतोष गांधी, डॉ.ऋषिकेश राजवैद्य यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच प्रितम कोठारी, निलेश दोशी,प्रशांत दोशी,चि.यशराज गांधी,चि.भरतेश दोशी यांचे मोलाचे योगदान मिळाले.
समाजातील महिला,पुरुष,मुले आणि मुली यांनी उत्साहपूर्ण वातावरणात रक्तदान केले.