आ.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते गुळेवाडीत हायमास्ट दिव्यांचा लोकार्पण सोहळा

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

गुळेवाडी(विभूतवाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा फंडातून सरपंच चंद्रकांत पावणे,सर्व सदस्य यांच्या प्रयत्नातून हायमास्ट पोल बसवण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचा लोकार्पण सोहळा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडला.
हायमास्ट पोलचे काम वेळत पूर्ण करून पोल गुळेवाडीच्या जनतेच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. या पोलमुळे गावातील मुख्य ठिकाण व मागासवर्गीय वस्तीतील अंधाराची समस्या कायमची दूर होणार आहे.
सरपंच चंद्रकांत पावणे, भाजपा नेते जयवंतराव सरगर,उमेशराजे अनुसे,ग्रामसेवक संदीप वळवी,माजी उपसरपंच सिद्धा थोरात,स्वाती मोटे,सदस्य हरी कांबळे,जयश्री खरजे,सखुबाई मोटे,रामचंद्र खरजे व संजय थोरात(पोलीस पाटील),आप्पा थोरात, दत्ता थोरात,बिरा थोरात, नाना पडळकर,रवींद्र थोरात,माजी पोलीस पाटील, माजी उपसरपंच हुबाले,तुकाराम पावणे,तानाजी पाटील,मोहन खरजे,रमेश खरजे,माजी उपसरपंच बिरा मोटे,विवेक पावणे,दादासो खरजे,किरण पवार,बाळू मोटे,गोपी कुंभार,सुनील थोरात,नाना चव्हाण,रामचंद्र मोटे(ग्रामसेवक गोमेवाडी),अक्षय थोरात,टाकी कट्टा ग्रुप,डायमंड क्रिकेट क्लब,गुळेवाडी मित्र परिवार,स्टार गोल्डन ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.