आ.सावंत यांची तिकोंडीतील गॅस स्फोटातील कुटूंबाला मदत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

तिकोंडी येथे गॅसचा स्फोट होऊन काशीबाई बसाप्पा चौधरी यांचे घर जाळून खाक झाले होते.या नुकसानीची  पाहणी करून विक्रम फाउंडेशनकडून धनादेश देत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चौधरी कुटूंबाला मदत केली.
अधिक माहिती अशी की,तिकोंडी ता.जत येथे गॅसचा स्फोट होऊन काशीबाई बसप्पा चौधरी यांचे छप्परवजा पत्र्याचे घर जाळून खाक झाले होते.यामध्ये सुमारे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले आहे.ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली होती.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यामध्ये २५ हजार रोख रक्कम,संसारोपयोगी साहित्य,२५ हजार रुपये किमतीची बागेची औषधें ,२ तोळे सोने,२ तोळे चांदी व ५ पोती ज्वारी जळाली आहे.एकूण सुमारे पाच ते सात लाखाचे नुकसान झाल्याचे समजते.वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही.या पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त मदत प्रशासन व इतर माध्यमातून मदत करावी अशी मागणी होत आहे.