फोंडशिरस मध्ये जबरी चोरी; ९ लाख,४८ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब

डीवायएसपी निरज राजगुरु यांंची घटनास्थळी भेट
संजय हुलगे :
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील शेतकरी हनुमंत बाळू गोरे यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री २:४५ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी करून सुमारे रोकड ९,४८,००० रुपयांचा मुद्देमाल गायब केला असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा किशोर हनुमंत गोरे यांनी नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.त्याचबरोबर सोलापूरहून आलेल्या श्वान पथकाकडून तपासणी करून पंचनामा करण्यात आला.यावेळी अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू घटनास्थळी त्वरित दाखल झाले व परिस्थितीची पाहणीकेली. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि मनोज सोनवलकर हे करीत आहेत.