भांबुर्डी येथे अहिल्यादेवी सिंचन विहिरीचे भूमिपूजन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस तालुक्यातील मांडवे, कन्हेर,भांबुर्डी येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिर योजनेतुन मंजूर झालेल्या विहिरींचे भूमिपूजन व तीर्थ क्षेत्र विकास निधीतुन मंजूर झालेल्या मारुती मंदिर सभामंडपाचा पायभरणी कार्यक्रम विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती शोभाताई साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, गणपतराव वाघमोडे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, राहुल बापू वाघमोडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास करणे, शिवामृत दूध संघांचे संचालक खुडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ माने, माजी उपसभापती शंकरराव भानवसे, पंचायत समिती सदस्य मानशिंग मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन गायकवाड, माजी सरपंच तानाजी पालवे, कुमार पाटील,एकशिव सरपंच शहाजी धाईगुडे, भांबुर्डी सरपंच दादासाहेब वाघमोडे, जाधववाडी सरपंच शिवाजी जाधव,कन्हेर सरपंच पोपट माने, धर्मराज माने, पुरंदावडे सरपंच देविदास ढोपे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे सचिव अरविंद भोसले, राहुल रुपनवर, शरद साळुंखे, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष रावसाहेब वाघमोडे, पोलीस पाटील नितीन सोनटक्के, आणा पाटील, हनुमंत शेंडगे, राहुल दुधाळ, सह. गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण , मुंडफने ,सूळ , रोजगार हमी योजनेचे सुर्यकांत सरगर , माने , सुरज साळुंखे,शंकर बर्वे, ग्रामसेवक भोसले,ग्रामसेवक मस्के, माऊली पाटील, विष्णू वाघमोडे, राजू रोगे, विठ्ठल अर्जुन, माजी सरपंच केशव वाघमोडे ,रोजगार सेवक संतोष वाघमोडे ,मांडवे, कन्हेर,भांबुर्डी गावातील ग्रामस्थ व लाभार्थी वसंत चव्हाण, धूळदेव शेंडगे, विजय वाघमोडे, तानाजी बंडगर, अर्जुन मारुती सरगर सह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.