
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीचे निवेदन आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेले आहेत,ते कायदे शेतकरी विरोधातील असून ते शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे कायदे आहेत.ते कायदे रद्द करण्यात यावेत. तसेच घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाचे भाव कमी करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.
आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.यावेळी नामदेव खरात, राखीताई खरात, भिकाजी खरात,शैलेंद्र ऐवळे,अमोल जावीर,निखिल खरात, मिलिंद ढोकळे,नवनाथ जावीर,शिवाजी लांडगे, पुरोगामी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष अमोल लांडगे उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद