
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील उटगी येथे घडलेल्या घटनेत ग्रामपंचायत उटगीचे तंटामुक्त समितीचे सदस्य मल्लप्पा धुंडाप्पा केसगोंड (वय वर्षे 52) यांचा संशयित आरोपी पुतण्या भालचंद्र सिद्धप्पा केसगोंड यांने टेम्पो अंगावर घालून खून केल्याची नोंद उमदी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, उटगी ता.जत येथील अंकलगी तलावाच्या जवळ मल्लप्पा धुंडाप्पा केसागोंड हे स्वतःच्या मालकीच्या शेतात कुटुंबियांसह राहतात.केसगोंड हे उटगी ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. ते उटगी येथील अंबाभवानी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती .बुधवारी रात्री सायंकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मल्लप्पा केसगोंड हे आपल्या दुचाकीवरून उटगी ते चनगोंड रस्त्यावरून घरी जात असताना मागील बाजूने टेम्पोने धडक दिली. मल्लप्पा यांना 20 फुटांपर्यंत फरफटत नेले. मल्लप्पा गंभीर जखमी झाले.वाटेवरुन ये-जा करण्याऱ्या नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. टेम्पोच्या चाकात मल्लप्पाची दुचाकी अडकली.दरम्यान टेम्पो चालक संशयीत आरोपी पुतण्या भालचंद्र सिद्धप्पा केसगोंड यांने अपघात स्थळापासून तब्बल पाचशे मीटरपर्यंत टेम्पो नेत थांबवून पळ काढला.या खूनाच्या घटनेस शेत जमिनीचा वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.सदर घटनेची नोंद उमदी पोलिसांत करण्यात आली असून अधिक तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर हे करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या