लाच घेतल्यानंतर दरीबडचीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत तालुक्यातील दरीबडची येथील तलाठी विलास भरमा चव्हाण (वय ४८ वर्ष तलाठी, दरिबडची) यांना ५००/- रुपये लाच घेतल्यानंतर रंगेहात पकडले.
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांच्या भावाची इकराराची नोंद घेवुन इकरार देण्याकरीता दरीबडची, जत येथील
तक्रारदार यांनी कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दिनांक ०६.०१. २०२१ सोजी ब्यरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती ५००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम घेवून येण्यास सांगितलेचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच तलाठी कार्यालय दरीबडची येथे सापळा लावला असता विलास भरमन्ना चव्हाण (वय ४८ वर्ष, दरिबडची, जत, सांगली वर्ग-३) यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करूम तक्रारदार यांचेकडून ५००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. विलास भरमन्ना चव्हाण यांचेविरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.