प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोल्हापूर :
मानव सुरक्षा सेवा संघ कोल्हापूर यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. गजानन राशिनकर यांच्या हस्ते 25 कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.तर याच वेळी डॉ. गजानन राशिनकर यांनी ब्रेस्ट कॅन्सरवरील संशोधन केल्यामुळे त्यांचा गौरव पोलीस उपधीक्षक सुनीता नाशिककर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. राशिनकर म्हणाले की, मानव सुरक्षा सेवा संघाने दिलेला ज्ञान, विज्ञान,कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य पुरस्कार मी माझ्या वडिलांना समर्पित करीत आहे. त्यांनी हे संशोधन करताना गेल्या वीस वर्षांमध्ये आलेले अनुभव यावेळी उपस्थितांसमोर कथन केले.
व्यासपीठावर राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश डवरी, कोषाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संघटन मंत्री दिलीप शेटे, राज्य महिला उपाध्यक्ष रेणू पिळगावकर, राज्य महिला प्रमुख गीता गायकवाड आणि राज्य महिला प्रवक्ता माधुरी गुजराती यांच्यासह कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शामराव केळकर , जिल्हा प्रमुख संतोष शिंदे, जिल्हा महिला प्रवक्ता विद्यालक्ष्मी राजहंस,जिल्हा अध्यक्ष सविता गंगधर , मंदार तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मध्ये उपाध्यक्ष अंकुश निपाणीकर यांनी प्रा. डॉ. गजानन राशिनकर यांचे एकूण राहणीमान आणि कष्ट पाहता हे एक वेगळेच रसायन आहे,असे मत व्यक्त केले आणि मानव सुरक्षा सेवा संघाचे कार्य आणि कर्तव्य याविषयी माहिती दिली.
अन्याय व अत्याचार विरोधात लढण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन गीता गायकवाड यांनी केले.
प्रमुख पाहुणे सुनिता नाशिककर यांनी सामाजिक संस्थांना सेवा करताना मर्यादा नसते,मात्र कायद्याला मर्यादा असतात. सेवाभाव बाजूला ठेवून कायदा पहावा लागतो असे सांगितले.
माधुरी गुजराती म्हणाल्या की,अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या संस्थेचे कार्य असून महिलांना उद्योग देणे,त्यांचे उत्पादन खरेदी करणे आणि मार्केट उपलब्ध करून देण्याबरोबरच तळागाळातील लोकांचा सत्कार करणे हा उद्देश आहे.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद