शिक्षक समितीचा दमदार व दिमाखदार सोहळा संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आटपाडी पंचायत समितीचे नूतन उपसभापती दादासाहेब मरगळे, सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे यांचा वाढदिवस तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र राज्य परिवहनचे आबासाहेब गायकवाड आणि नामदेव झरीवाड यांचा वाढदिवस आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षक बँक सभागृहात संपन्न करण्यात आला.
यावेळी शिक्षकांच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील प्रश्नांसंदर्भातचा उहापोह शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु .टी .जाधव यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना जिल्हा परिषद सदस्य अरुण भाऊ यांनी शिक्षकांचे कोणतेही प्रश्न हक्काने सांगावेत व ते सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शिक्षक समितीस धन्यवाद दिले.उपसभापती दादासाहेब मरगळे यांनी तालुकास्तरावरील शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक समितीस नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले.युवा नेते जयवंत सरगर यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे स्वागत आदर्श शिक्षक हैबतराव पावणे यांनी केले .सूत्रसंचालन श्रीकांतराजे कुंभार यांनी केले.यावेळी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड, शिक्षक नेते सचिन देठे, माजी उपसभापती भागवत माळी,अजय राक्षे, दीपक कुंभार ,संजय कबीर ,रमेश हेगडे ,सत्यवान माने , रावसाहेब देवडकर,सत्यवान मोटे, विठ्ठलपंत माळी, सर्जेराव पुजारी, मुकेश क्षिरसागर, तुकाराम मुंढे ,आजिनाथ आंधळे, दादासाहेब लोखंडे, यशवंत मोरे, बाळासाहेब ठोंबरे ,गणेश मोटे,चंद्रकांत गवळी, सतीश पुसावळे, बाळासाहेब साळुंखे, बाळासाहेब ठोंबरे,राजेंद्र कांबळे, विजय वाघमारे, विठ्ठल डोंबाळे ,पंकज चांडवले, देवीदास पाटील ,भास्करराव डिगोळे , पत्रकार विक्रम वाक्षे, प्रकाश गावंदरे, संजय देशमुख, देवीदास पाटील, महेश गावंदरे,आदी उपस्थित होते . आभार जगदीश खाडे यांनी मानले.