पोपट वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
गोमूत्रात वनौषधी मिसळून विविध व्याधींवर यशस्वी इलाज करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील दिघंची गावचे विवेकानंद रघुनाथ जितकर यांना मान अभिमान विकास फाऊंडेशनने राष्ट्रीय पंचगव्य सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा कार्यक्रम कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे झाला. जितकरांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देणेत आला. या पुरस्काराचे नियोजन मान अभिमान विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अरुण पिसाळ, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा.विनोद कदम, मार्गदर्शक एनआयएस कोच अमोल साठे, भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरिष कदम, ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनचे सीईओ विनोद शिंदे, आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव विकास संस्था गोळेश्वरचे अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.
गव्यसिध्द पदवीप्राप्त जितकर हे गाईच्या गोमूत्रात व्याधीला अनुकूल अशा वनौषधींचा समावेश करुन गोमूत्र अर्क रुग्णांना देऊन बरे करतात. त्यांच्या या औषधांचे रुग्णांकडून स्वागत होत आहे. बरे झालेले रुग्ण त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत. या त्यांच्या सामाजिक कार्याची उचित दखल मान अभिमान विकास फाऊंडेशनने विशेष पुरस्कार देऊन घेतली आहे. या पुरस्काराने दिघंचीचे प्रसिद्ध गव्यसिध्द विवेकानंद जितकर सह-कुटुंबिय सन्मानित झाले आहे.
आटपाडी,दिघंचीकरांकडून पुरस्काराचे स्वागत
गव्यसिध्द जितकर यांच्या पुरस्कार कार्यक्रमाला आटपाडी, दिघंचीतील मान्यवरांची पुरस्काराच्या कराड येथील कार्यक्रमाला हजेरी मोठ्या प्रमाणात होती. आटपाडी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, माजी सभापती जयमालाताई देशमुख, पं. समिती सदस्या उषाताई कुटे, जि.प. सदस्य मोहनकाका रणदिवे, आटपाडी मार्केट कमिटीचे संचालक नाना मेणकुदळे, जिल्हा आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, दिघंची जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक शांताराम यादव, भास्करराव डिगोळे, ग्रामपंचायत सदस्य केशवभाई मिसाळ, समाधान नळ, प्रणव गुरव,शिवप्रतिष्ठानचे सोपान काळे, पत्रकार पोपटराव वाघमारे, कांतीलाल कारळे, उद्योजक नितीनबापू मोरे, सूरज शिंदे, विटा अर्बन संचालक अरुण टिंगरे, पी.एल. देशमुख, अफजल मुलाणी, सोमनाथ कुंभार, आटपाडीचे कराटे असोसिएशनचे तालुकाध्यक्ष गणेश राक्षे, तायक्वांदो जिल्हाध्यक्ष श्याम राक्षे, युवा उद्योजक फिरोज मुलाणी, डी.वाय.पाटील काॅलेज पुण्याचे प्राध्यापक राष्ट्रीय साम्बो (मार्शल आर्ट) चॅम्पियन सुवर्णपदक विजेते आबाजी माने, वरकुटे- कुरणेवाडीचे माजी सरपंच भिमराव आटपाडकर, पुणे जिल्हा शासकीय जप्ती व विक्री विशेष वसूली अधिकारी बापूसाहेब गोरवे यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद