सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:
कोसारी गावचे सुपुत्र अनिल बाळासो महारनुर यांची पीएसआय-पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
कोसारी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा झाला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय कोसारी येथे हा सत्कार सोहळा संपन्न झाला. सर्व मान्यवरांनी महारनुर यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
यावेळी युवा नेते नाथाजी पाटील,कोसारी उपसरपंच बाळासाहेब पवार,बापुसो महारनुर,माजी उपसरपंच मधुकर भोसले,उत्तम महारनुर,संतोष महारनुर,दिनेश चव्हाण,सागर गुजले यासह सर्व नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद