मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
समाजसेवक संभाजीशेठ पाटील व मिशन परिवार यांचेकडून दिघंची येथील नवनाथ नाना जावीर यांच्या मुलाच्या म्हणजे विघ्नेश यांच्या डोळ्याच्या गंभीर आजारावर उपचारासाठी अॅड. सचिन सातपुते यांच्याहस्ते पाच हजार रुपये मदत देण्यात आली.ही रक्कम नवनाथचे मित्र ताजु झारी यांनी स्वीकारून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आटपाडी या नवनाथच्या खातेवर पाठवली. प्रगल्भनायकच्या टीमने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रगल्भनायक न्यूज च्या माध्यमातून त्याच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते व मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये रवानगी केली होती.सध्या विघ्नेश याला मुंबई येथे उपचारासाठी पाठवले आहे.
नवनाथ यांची घरची परिस्थिती साधारण असून त्यांना सध्या लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे.
समासेवक संभाजीशेठ पाटील यांचा 13 फेब्रुवारी हा लग्नाचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी विघ्नेश यास मदत करून त्यांनी आपली समाजासाठीची सामाजिक बांधिलकी यानिमित्ताने जपली आहे.
अशा दानशूर लोकांच्या मदतीने विघ्नेश या गंभीर आजारातून बरा होऊन जावीर कुटूंब चिंतामुक्त व्हावे ही सदिच्छा.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद