अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
बहुजन समाज पार्टी,जत विधानसभेच्या वतीने त्यागमूर्ती महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी अतुल कांबळे बोलत होते.
बहुजनांचे नेते अतुल (दादा) कांबळे यांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. माता रमाई यांच्या त्याग व कार्याची माहीती देताना अतुल कांबळे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर बहुजन व वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, महासचिव शरद शिवशरण, शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे, नितीन शिवशरण, शहर महासचिव दिपक कांबळे, शहराध्यक्ष सुनिल क्यातन, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद